मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने गेल्या महिन्यात दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी . एंगेजमेंट केली. एंगेजमेंटनंतर परिणीती सतत चर्चेत आहे. दरम्यान, आता परिणीतीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गाणे गाताना दिसत आहे.
अभिनेत्री असण्यासोबतच परिणीती चोप्रा एक चांगली गायिका देखील आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अलीकडेच, तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत: गाणे गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओमध्ये परिणीती डबिंग स्टुडिओच्या फरशीवर बसून ‘तू झूम’ गाणे गात आहे. तिची ही शैली पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.
व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले,’कधीकधी चांगले क्षण सहज सापडतात. डबिंग स्टुडिओमध्ये गेले आणि माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक गाणे मला गेला मिळाले. निखळ आनंद #TuJhoom #ParineetiChopra’
परिणीतीच्या आवाजातील हे गाणे ऐकून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘तू रॉकस्टार आहेस’. परिणीती चोप्रा लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.