टेनिस स्पर्धेत परी चव्हाण उपांत्य फेरीत

औरंगाबाद: एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्‍स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या परी चव्हाण, सिद्धार्थ मराठे, जैष्णव शिंदे व मुलींच्या गटात रुमा गायकैवारी यांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटातील सामन्यात परी चव्हाणने पंजावच्या साहिरा सिंगचा 6-1, 6-4 असा पराबव केला. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकित सिद्धार्थ मराठेने कर्नाटकच्या दुस-या मानांकित प्रणव रेथीनचा 7-5, 6-2 असा तर जैष्णव शिंदेने कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित ऋषील खोसलाचा 6-2, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित काहिर वारीकचा 6-1, 6-3 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली.

मुलींच्या गटात उपांत्यपूर्व महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित रुमा गायकैवारीने हरियाणाच्या दुसऱ्या मानांकित नंदिनी दीक्षितचा 6-4, 6-2 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकित परी चव्हाणने पंजाबच्या साहिरा सिंगचा 6-1, 6-4 असा तर महाराष्ट्रच्या सायना देशपांडेने मधुरिमा सावंतचा 6-4, 3-6, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.