मुंबई – प्रियदर्शन दिग्दर्शित हिअरा फेरी चित्रपट प्रचंड लोकप्रिय आहे. बाबुराव,शाम आणि राजुची या चित्रपटातील केमेट्री सर्वांनाच खूप आवडते. म्हणून चित्रपटाचा दुसरा पार्ट फिर हेराफेरी देखील खूप प्रसिद्ध झाला. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाची. परंतु तिसऱ्या भागात अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनची एंट्री होणार आहे. यावरच आता अभिनेते परेश रावल यांनी भाष्य केलं आहे.
अभिनेते परेश रावल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेरा फेरीच्या कास्टिंगबाबत वक्तव्य केलं आहे. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला घेतल्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत याबाबत त्यांना यावेळी विचारण्यात आले. ते म्हणतात मी कधीही पाहत नाही की मी कोणत्या कलाकारासोबत स्क्रिन शेअर करतोय.
“चित्रपटात कोणाला घ्यायचं हा निर्णय पूर्णपणे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शकांचा आहे. मी त्यांच्या निर्णयात कधीही हस्तक्षेप करत नाही. माझ्याबरोबर कोण सहकलाकार असणार आहेत याचा मी कधीही विचार करत नाही. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो” असं स्पष्ट मत परेश रावल यांनी यावेळी मांडले.