देशात करोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता लोकांना बाहेर पडायचं असेल तरी सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लॉकडाउनची घोषणा केली. तेव्हा मोदी म्हणाले की, पुढच्या 21 दिवसांपर्यंत तुम्ही घरातून बाहेर पडणं विसरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. आरोग्य तज्ज्ञांनीसुद्धा याबाबत इशारा दिला आहे. आताच योग्य पावलं उचलली नाही तर करोनाचा विळखा अधिक तीव्र होईल.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगबाबत एक ट्विट केले आहे. परेश रावल म्हणाले होते की, शेवटी सोशल डिस्टन्सिंगचं हिंदी नाव मिळालं. हिंदीत याला “तन दूरी’ म्हणतात. परेश रावल यांच्या ट्विटरनंतर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. परेश रावल हे सोशल मीडियावर सक्रीय असतात.