चिंचवड,(वार्ताहर) – कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्यूनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी च्या विद्यार्थीसाठीची या शैक्षणिक वर्षातील पहिली ‘पालक सभा ‘आयोजित करण्यात आली .या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांच्या समग्र विकासाठीसाठी पालकांचा सक्रिय सहभाग आणि योगदान यावर चर्चा करण्यात आली .ही पालक सभा विज्ञान आणि कला व वाणिज्य अशा दोन टप्प्यात घेण्यात आली .या सभे लापालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपप्रचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांनी पालकांशी संवाद साधताना पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागरूक असणे गरजेचे असून मुलांचे अवाजवी लाड करू नयेत असे सांगत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांशी मैत्री करून आपलेसे करावे व त्यांच्याशी रोज संवाद करावा म्हणजे मुलं तुमच्यापासून दुरावणार नाहीत असे सांगितले. तसेच मुलांना अभ्यासाबरोबर क्रीडा,सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
या सभेस संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा,,विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या समन्वयिका डॉ सुनीता पटनायक, प्राध्यापिक जसमीन फरास, प्राध्यापिका वैशाली देशपांडे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थिक होता. या सभेचे सूत्रसंचालन डॉ रवींद्र निरगुडे व प्रा सुकन्या बॅनर्जी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सुनीता पटनाईक व डॉ अर्चना गांगड यांनी केले.