पालकांनो, स्कूल बस सुरक्षा समिती आहे का?

पुणे – घर ते शाळा आणि शाळा ते घर हे अंतर कापण्यासाठी अनेक पालक स्कूल बस, व्हॅन, रिक्षा आदी शालेय वाहतूक व्यवस्थांचा पर्याय निवडतात. हे पर्याय निवडताना सुरक्षितता, चांगले वातावरण, शिस्त आदी गोष्टींचा विचार पालकांकडून केला जातो. मात्र अनेकदा पालक “सुरक्षितता समिती’ची चौकशी करणे विसरतात. शालेय विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी, या हेतूने समितीची स्थापना करण्यात येते. महानगरपालिका क्षेत्र, जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती आणि शालेय परिवहन समिती वाहतुकीबाबत काम करते.

1. महानगरपालिका क्षेत्र
अध्यक्ष – पोलीस आयुक्त
सदस्य – महापालिका आयुक्त/अतिरिक्त आयुक्त.सदस्य – महानगरपालिका परिवहन महाव्यवस्थापक / परिवहन व्यवस्थापक
सदस्य – शिक्षण निरीक्षण/ शिक्षणाधिकारी
सदस्य – स्कूल बस संघटनेचे प्रतिनिधी
सदस्य – अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेल्या शाळा अणि महाविद्यालयांचे प्रतिनिधी
सदस्य सचिव – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

2. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती
अध्यक्ष – पोलीस अधीक्षक, ग्रामीण
सदस्य – मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)
सदस्य – मुख्याधिकारी, नगर परिषद
सदस्य – विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ
सदस्य – शिक्षणाधिकारी
सदस्य – अध्यक्षांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी
सदस्य सचिव – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.