‘पुढाऱ्यांना’ वाकून नमस्कार करण्यापेक्षा ‘आई-वडिलांना’ करा : अजित पवार

पिंपरी-चिंचवड:  पुढारी आता पूर्वीसारखे राहिले नाही, त्यामुळे पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथील विध्यार्थ्यांना दिला. नियुक्ती पत्रक वाटपाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.

दरम्यान, नियुक्ती पत्रकाचे वाटपकरताना एका विद्यार्थ्याने अजित पवार यांना वाकून नमस्कार केला. तोच धागा पकडून अजित पवार यांनी पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका, स्वतःच्या आई-वडिलांना किंवा सासू-सासऱ्यांना नमस्कार करा, असे अजित पवार म्हणाले.

मात्र, पुढाऱ्यांची कुंडली पाहिली तर तुम्हाला वाटेल कुठून अवदसा आठवली आणि यांच्या पाया पडलो. असेही अजित पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.