मुले घडवण्याची जबाबदारी पालकांचीही

अनिल देवकाते : लाखेवाडी येथे मल्हार महोत्सवास थाटात प्रारंभ

रेडा – आपली मुले वरिष्ठ पदावर जाण्यासाठी मुलांचे पालक कोणत्या पदावर असणे आवश्‍यक नाही. शिक्षकांबरोबरीने पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले तरच मुलांचे भवितव्य घडते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अनिल देवकाते यांनी केले.

जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे विद्यानिकेतन स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेजचा मल्हार महोत्सव 2020 चे उद्‌घाटन देवकाते, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे खासगी सचिव दिलीप ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वस्तू व सेवा कर राज्यकर उपायुक्‍त सुजाता ढोले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुहास चौरे, जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, प्रमुख मुख्य सचिव हर्षवर्धन खाडे, सल्लागार प्रदीप गुरव, प्राचार्य बालाजी मोटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, उपाध्यक्ष संदीप सुतार, मुख्य सचिव सागर शिंदे, मार्गदर्शक मधुकर गलांडे यांचा विशेष सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने ढोले यांच्या हस्ते करण्यात आला.
देवकाते म्हणाले की, आम्ही देखील काटीसारख्या लहान गावात शालेय शिक्षण घेतले.

त्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती असताना देखील विद्यार्थी मनापासून अध्ययन करायचा. यापैकीच आम्ही होतो. 32 वर्षांपासून ढोले परिवाराचा आणि आमचा स्नेह आहे. ढोले कुटुंबीयांनी जय भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना अद्ययावत शिक्षण शिकण्यासाठी शिक्षणाचे दालन उघडे केले आहे.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले म्हणाले की, गावाकडील मुले मुली यांना शहरी भागाप्रमाणे शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शैक्षणिक संकुलची निर्मिती केली आहे.अवघ्या दोन वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब करगळ, भूमिअभिलेख उपअधीक्षक गणेश कराड, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, माजी संचालक सोमेश्‍वर वाघमोडे, नंदकुमार पानसरे, डॉ. मिलिंद खाडे, पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य सचिव हर्षवर्धन खाडे यांनी आभार मानले

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here