मुलांवरील अर्थसंस्काराची जबाबदारी पालकांची (भाग-२)

आपल्या भावी पिढीला आर्थिक व्यवहारात संपूर्ण स्वावलंबी करण्यासाठी संपूर्ण अर्थकारण नीट समजावून सांगणे तसेच वेळोवेळी गरजेनुसार मार्गदर्शन करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.

मुलांवरील अर्थसंस्काराची जबाबदारी पालकांची (भाग-१)

सध्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात मुलांनाबचत व गुंतवणुकीचे कोणतेही ज्ञान मिळत नाही. म्हणूनच बचतीचे महत्त्व, पैशाचे नियोजन व गुंतवणुकीचे फायदे भावी पिढीला निश्चित समजावले पाहिजेत. पैशांचा योग्य विनिमय करणे हे आर्थिक कौशल्य आहे. आर्थिक संकट निर्माण होऊ नये याची दक्षता कशी घ्यायची, अचानक संकट उद्भवलेच तर भांबावून न जाता शांतपणे इतक्‍या दिवस केलेल्या गुंतवणुकीचा कसा वापर करायचा, त्यासाठी किती बारकाईने नियोजन करायचे, संकट नसतानाच्या काळात खर्चाचे नियोजन कसे करायचे, आवश्‍यक व अनावश्‍यक खर्च यांची विभागणी कशी करावी, खर्चाचा प्राधान्यक्रम कसा लावायचा याचे संस्कार मुलांवर होणे गरजेचे आहे. मुलांना योग्य अशा खर्चांच्या सवयी लावणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. याची सुरवात स्वतःपासून करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक पालकाने स्वतःचे आर्थिक नियोजन व गुंतणुकीच्या योजना, खर्च व कर्ज यांचे केलेले सुयोग्य नियोजन या सर्वांची सविस्तर चर्चा आपल्या मुलांबरोबर करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण कमावलेल्या पैशाचे नियोजन कशाप्रकारे करत आहोत हे भावी पिढीस कळेल. पालक जे कष्ट घेत आहेत व प्रत्येक गोष्टींचे योग्य नियोजन करत आहेत याचे जिवंत उदाहरण मुलांना पाहायला मिळाले पाहिजे.

केवळ आजचा विचार न करता, प्रामुख्याने भविष्याचा विचार करणे आणि त्यासाठी दररोज खर्च व बचत यांचे नियोजन व योग्य सांगड कशी करावी हे सांगितले पाहिजे. यासाठी पालकांनी गरजेनुसार आपल्या आर्थिक सल्लागाराशीही आपल्या मुलांची भेट घालून देऊन सदर बाबींवर सविस्तर चर्चा केली पाहिजे.

भविष्यात येणारे खर्च वाढत जाणार आहेत. महागाई, व्याजाचे दर व गुंतवणुकीचा परतावा या सर्वांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे यासाठी सुयोग्य आर्थिक नियोजन गरजेचे आहे. आर्थिक ताणतणाव कसा कमी करता येईल हे पाहिले पाहिजे. शक्‍यतो कमावलेल्या पैशांमध्येच सर्व गरजा कशा भागवता येतील, कर्ज घेणे कसे टाळता येईल यासाठी मुलांना मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे, येणाऱ्या काळात मुलांसाठी आपण शिक्षणावर व त्यांच्या राहणीमानावर नेमका किती खर्च करणार आहोत याचेही नियोजन व खर्चांचे आकडे यांची मुलांसोबत चर्चा करा. मुलांसाठी घेतल्या जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठीच्या पैशाचे नियोजन तसेच त्यानंतरच्या वाहन खर्चासाठीचे पैसे कसे साठवावेत याबाबतही माहिती मुलांना द्या. आपल्या भावी पिढीला आर्थिक व्यवहारात संपूर्ण स्वावलंबी करण्यासाठी संपूर्ण अर्थकारण नीट समजावून सांगणे तसेच वेळोवेळी गरजेनुसार मार्गदर्शन करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.