आरटीई ऑनलाइन अर्जाचा बोजा पडतोय पालकांवर

शिक्षण विभागाचे मदत केंद्र नावालाच; पालकांना भुर्दंड

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यासाठी पालकांकडून 100 शुल्क आकारण्यात येत आहे. शहरातील माहिती सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात असून यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी सुरू केलेले मदत केंद्र केवळ नावालाच असल्याने पालकांना नाईलाजास्तव पैसे देऊन अर्ज भरावा लागत आहे.

आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. राज्यात यंदा अर्जांची संख्या वाढली आहे. बहुतांश पालकांना अर्ज करण्यासाठी माहिती सुविधा केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. याठिकाणी 100 रुपये घेऊन पालकांचे अर्ज
भरून घेतले जात आहेत. यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रवेशप्रक्रियेसाठी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रात पालकांना अर्ज, कागदपत्रे आणि प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले जात आहेत. मात्र, त्या मदत केंद्राकडून योग्य माहिती मिळत नसल्याने पालकांची मोठी अडचण होत आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आरटीई ऍप आहे. त्याद्वारे पालकांना अर्ज भरणे शक्‍य आहेत. तसेच मदत केंद्राकडून अर्ज भरताना सहाय्य घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. मात्र, मदत केंद्राद्वारे योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, आरटीईत आतापर्यंत 1 लाख 37 हजार 605 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक 33 हजार 228 अर्ज प्राप्त झाले आहेत

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)