परभणीत विवाहितेची पतीकडून हत्या

परभणी – परभणी येथे दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या आपसातील वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे प्रेमविवाह केल्यामुळे दीड वर्षांपूर्वीच या तरुणीच्या आई-वडिलांनी मुलाच्या आईचा दगडाने ठेचून खून केला होता. मुलीच्या आई-वडीलांना न्यायालयाने कोठडी सुनावली होती. या मर्डर मिस्ट्रीने परभणीत खळबळ उडाली आहे.

परभणी शहरातील पंचशील नगर येथील अनंत खंदारे व मयुरी वाकळे या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. यातूनच त्यांनी दोन वर्षांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या 6 महिन्यानंतर मयुरीची आई आणि वडील चंद्रकांत वाकळे यांनी अनंत खंदारे याच्या आईची (वाकळेंची विहीन) गयाबाई खंदारे यांची दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी मयुरीचे आई-वडिल न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मयुरीच्या आईचा जामीन मंजूर झाला, परंतु वडील कारागृहातच आहेत. मंगळवारी रात्री मयुरी आणि अनंत यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात अनंतने मयुरीचा गळा दाबून खून केला आणि तो पसार झाला. नेमका अनंतने आईच्या खुनाचा बदला घेतला की या खुनामागे अजून कोणते कारण आहे? याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)