परभणी – जिल्ह्यातील सेलू येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला दहा लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. डीवायएसपी राजेंद्र पाल आणि पोलीस नाईक चव्हाण यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
डीवायएसपी पाल यांनी एकाला मृत्यूच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन तब्बल दोन कोटी रुपये मागितले होते. या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून दीड कोटींची लाच ठरली ज्याचा पहिला टोकन 10 लाख घेताना एका पोलीस कर्मचाऱ्यास मुंबई एसीबीच्या टीमने रंगेहात पकडले. डीवायएसपी यांच्यासाठी ही लाच घेण्यात आल्याने डीवायएसपी राजेंद्र पाल आणि पोलीस नाईक चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.