महिलेला जबरदस्तीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न; सावकारावर गुन्हा दाखल

परभणी – जमीन परत मागितली म्हणून जिंतूर तालुक्यातील इटोली येथील साई नगर तांडा येथे महिलेस जबरदस्तीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची संतापजनक घटना घडली आहे. गिरीजा आडे या महिलेस विष पाजण्यात आले असून त्यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गिरीजा आडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अवैध सावकारी करणारा सावकार आणि त्याच्या पत्नीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास परभणी पोलीस करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.