परमवीर सिंह चंदीगडमध्ये? लवकरच न्यायालयासमोर होणार हजर

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आलेले आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले परमवीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यानंतर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. परंतु परमवीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

परमवीर सिंह यांना 17 नोव्हेंबरला फरार घोषित करण्यात आले होते. फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. 30 दिवसांत परमवीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता.

परंतु त्या अगोदर परमवीर सिंह चंदीगढ येथे असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. तसेच ते लवकरच न्यायालयाच्या आदेशानुसार हजर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.