विमानाने आले आणि थेट कार्यालय गाठले; परमवीरसिंह अखेर मुंबई पोलिसांपुढे हजर

विमानतळावरून थेट गुन्हे शाखेत रवाना, पत्रकारांशी बोलणे टाळले

मुंबई – न्यायालयाने फरार घोषित केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग हे गुरूवारी मुंबईत आले. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत तपासात सहकार्य करण्यासाठी हजेरी लावली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सिंह हे चंदिगडहून विमानाने मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे कार्यालय गाठले. ते तपासात सहकार्य करतील अशी अपेक्षा पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासात सहकार्य करत असल्याचे त्यांनी विमानतळावर सांगितले. दरम्यान परमवीरसिंह मुंबईत आल्यानंतर घडामोडींना वेग आला. राज्याचे महाधिवक्‍ते अशुतोष कुंभकोणी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी परमवीर यांच्यावर कोणत्या पध्दतीने कारवाई करता येईल, याची माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली असल्याची अटकळ व्यक्त होत आहे.

विमानतळावरून पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाका क्र. 11 च्या कार्यालयात परमवीरसिंह हजर झाले. त्यांच्यावर दाखल असलेल्या गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात त्यांचा जबाब येथे नोदवण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या आयपीएस अधिकाऱ्यावर राज्यात खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. परमवीर यांनी बुधवारी पत्रकारांना आपण चंदिगढमध्ये असल्याचे सांगितले होते.

अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सिंह यांची बदली गृहरक्षक दलाचे महानिदेशक म्हणुन करण्यात आली होती. त्यानंतर सुरवातीला वैद्यकीय रजेवर गेलेले परमवीर त्यानंतर कोणतीही सूचना न देता कार्यालयात आलेले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.