Shraddha Gaikwad – अहमदाबाद येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राकडून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये बऱ्याच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत वेगवेगळी पदकं जिंकली आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विविध ठिकाणातून खेळाडू आपल्या राज्याच प्रतिनिधित्व करण्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहे. याच स्पर्धेत बीड जिल्ह्यातील परळीच्या श्रद्धा गायकवाड हिने स्केट बोर्डिंग खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
श्राद्धाला ( Shraddha Gaikwad ) तिच्या या यशाचं फळ स्केट बोर्डिंग या क्रीडा प्रकारात फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवडीच्या रूपाने मिळाले आहे. श्राद्धाच्या या कामगिरीमुळे तिच्यांसह जिल्ह्याचेही नाव संपूर्ण देशात पसरले आहे. अतिशय बिकट परिस्थितीवर मत करत श्रद्धाने हे यश मिळवले आहे.
श्रद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातून वर आलेली मुलगी आहे. परळीचे रविंद्र गायकवाड यांची ती कन्या असुन श्रद्धाचे ( Shraddha Gaikwad ) वडील रविंद्र गायकवाड हे पुण्यामध्ये एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्याचबरोबर श्रद्धाने आता फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकून आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव संपूर्ण जगात पोहोचवावे अशी परळीवासियांची इच्छा आहे.
Security guard’s daughter from Pune wins gold in skateboarding – National Games 2022
It was the financial distress that forced Shraddha Gaikwad’s father to shift the family base from Beed to Pune in search of a living, four years ago…@StreetLeague https://t.co/NrE5we0gXe
— Saurabh Duggal (@duggal_saurabh) October 1, 2022