सत्तरीतील ‘जवानां’चे पॅरा-स्कायडायव्हिंग

पुण्यातील बॉम्बे सैपर्सला 200 वर्ष पूर्ण

पुणे : पुण्यातील बॉम्बे सैपर्सला 200 वर्ष झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने पुण्यातील दिघी बॉम्बे सैपर्स परिसरात आज स्काय डायव्हिंग, पॅरा ग्रँडिग, जिम्नॅस्टिक चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.

या वेळी बॉम्बे सैपर्सचे समादेशक मायकेल मॅथ्यू यांच्यासह लष्करी अधिकारी,विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. पॅरा ग्रँडिगच्या अधिकारी आणि जवानांनी 12 हजार फूट उंचीवरुन उडी घेऊन उपस्थितांचे मने जिंकली.

या प्रात्यक्षिकांचे वैशिष्ट्ये म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. गोस्वामी, आणि निवृत्त ब्रिगेडीअर एस आर माजगावकर या सत्तरी पार केलेल्या पूर्व अधिकाऱ्यांनी स्काय -डाव्हिंगचे प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.

एकूण 59 अधिकारी आणि जवानांनी पॅरा ग्रँडिगमध्ये सहभाग घेतला, यात बहुतेक अधिकाऱ्यांनी 50 पार केली आहे. बॉम्बे सैपर्सची स्थापन ब्रिटीश लष्कराने केली या विभागाची 1820 पासून ची कागदपत्रे उपलब्ध आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.