प. बंगालमध्ये ‘तृणमूल’ला धक्का; ‘या’ आमदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – २०१९ लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचा फटका सर्वच राजकीय नेत्यांना बसल्याचे दिसून येत आहे. बंगालमध्ये मोदी सरकारला रोखण्यात अपयश आल्यामुळे आणि अपेक्षेइतकं यश देखील मिळवता आलं नाही. यामुळे एकीकडे  ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तर दुसरीकडे  तृणमूल काँग्रेसला शुभांशु रॉयसह तृणमूल काँग्रेसच्या शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह या दोन आमदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 42 जागांपैकी 18 जागांवर भाजपने सत्ता बळकावली असून, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 22 जागांवरच  समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत तृणमूलला 2014 पेक्षा 12 जागा कमी मिळाल्या आहे. तर, गेल्या निवडणुकीत भाजपने फक्त 2 जागा मिळवल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.