कूचबिहार – लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे अनेक प्रकार समोर आले होते. काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
West Bengal: A TMC worker, Ajijar Rahaman killed in Cooch Behar. A local TMC leader says, “Azhar Ali, a member of BJP and some other people beat up & killed Ajijar Rahaman.” (5.6.19) pic.twitter.com/03UDnhwh4G
— ANI (@ANI) June 5, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुचबिहारमधील पेटला बाजारा परिसरात बुधवारी (5 जून) एका कार्यकर्त्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. अजीजूर रहमान यांच्या नातेवाईकांनी तसेच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या भाजपाने केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी अजीजूर यांच्या घरात घूसून त्यांना बेदम मारहाण करून हत्या केल्याचं म्हटलं आहे. तर भाजपाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी, पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली होती. भाजपने सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसवर या हत्येचा आरोप केला, तर प्राथमिक तपासात या हत्येमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.