नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे माजी प्रमुख ललित मोदी यांनी भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव असल्याचा विधानासाठी राहुल गांधी यांच्यावर युनायटेड किंगडमच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
i see just about every Tom dick and gandhi associates again and again saying i ama fugitive of justice. why ?How?and when was i to date ever convicted of same. unlike #Papu aka @RahulGandhi now an ordinary citizen saying it and it seems one and all oposition leaders have nothing…
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) March 30, 2023
आयपीएलमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांनी घेरल्यानंतर 2010 पासून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या ललित मोदी यांनी गुरुवारी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हटले की,’राहुल गांधी मला फरार म्हणत आहेत, परंतू त्यांच्याकडे याचे काय पुरावे आहेत. कोणत्या आधारे मला फरार म्हणत आहेत. मला कुठे दोषी ठरविले गेले आहे का ? त्यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते माहिती न ठेवता बदल्याचे राजकारण करत आहेत.” असे मोदी यांनी म्हटले आहे. ललित मोदी यांनी राहुल गांधी यांना उघडपणे पप्पू म्हणत राहुल गांधी आता सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, माजी आयपीएल प्रमुखांनी अनेक काँग्रेस नेत्यांवर परदेशात मालमत्ता असल्याचा आरोपही केला आणि सांगितले की ते त्यांच्या मालमत्तेचे पत्ते आणि चित्रे देऊ शकतात. भारतात बदनामीचे कठोर कायदे लागू होताच आपण भारतात परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अद्याप ललित मोदींच्या ट्विटवर किंवा त्यांच्या कायदेशीर धमकीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.