पेपर मिलला भीषण आग

पिंपरी – थेरगाव येथील पेपर मिलमध्ये शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. मिलच्या रॉ मटेरिअल शेजारीच आग लागल्याने काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. मात्र, अग्निशमन विभागाच्या जवानांनी सहा तास शर्थीचे प्रयत्न करत आग जास्त पसरू न दिल्याने मोठा अनर्थ टळला.

थेरगाव येथे असणाऱ्या पद्मजी पेपर मिल प्रोडक्‍ट कंपनीमध्ये शनिवार (दि. 24) मे रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच वल्लभनगर विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे स्वरूप भीषण असल्याने इतर ठिकाणच्या अग्निशमन विभागाचे बंबही मागवण्यात आले. सुमारे दहा बंब आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. आग आटोक्‍यात येत नसल्याने खासगी टॅंकरच्या माध्यमातून आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.