कागद व्यावसायिक समस्यांच्या गर्तेत

स्वतंत्र संकुलाची मागणी : व्यवसायाला पूरक वातावरणाची गरज

कागद पर्यावरणाचा शत्रू असल्याचा गैरसमज

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – “साक्षरता प्रसारण आणि प्रबोधनाचे काम करणारा कागद हा पर्यावरणाचा शत्रू आहे, असा गैरसमज आहे. इतकेच नव्हे, तर या कागदावर आकारला जाणारा जीएसटीदेखील 12 टक्के आहे. त्यातच सद्यस्थितीत कागद व्यावसायिकांना उपलब्ध असणारी जागा अतिशय गर्दीच्या ठिकाणी आहे, यामुळे कागद व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कागद व्यावसायिकांच्या सोयीसाठी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र कागद संकुल उभारण्यात यावे,’ अशी मागणी दि पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जतीन शहा यांनी केली.

दि. 1 ऑगस्ट रोजी असणाऱ्या कागद दिनानिमित्त शहा यांनी कागद व्यावसायिकांच्या समस्येबाबत माहिती दिली आहे. शहा म्हणाले, “कागद हा पर्यावरणपूरक पदार्थ आहे. तो विघटनशील असून अनेकदा कागदाचा पुनर्वापरदेखील केला जातो. मोठ्या प्रमाणात कागदाची निर्मिती ही भाताचा तूस, गव्हाचा तण आणि बगॅस यांच्यापासून होते. झाडे तोडून निर्माण केल्या जाणाऱ्या कागदाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कागद हा पर्यावरणपूरक असून, त्यासंदर्भात विनाकारण गैरसमज पसरविले जात आहेत. याव्यतिरिक्त कागदावरील जीएसटीचे प्रमाण हे 12 टक्के इतके आहे. कराचे प्रमाण जास्त असल्याने कागद महागला असून, परिणामी कागद व्यवसायावर परिणाम झाला आहे.’

महत्त्वाचे म्हणजे पुण्यातील कागद व्यवसाय हा मध्यवर्ती ठिकाणी पसरलेला आहे. अरूंद गल्ल्या, सतत असणारी वाहनांची गर्दी आणि वाहतुकीचा वाढता खर्च अशा समस्यांमुळे शहरातील कागद व्यावसायिकांना व्यवसायात अनेक मर्यादा येतात. त्यामुळे कागद व्यावसायिकांसाठी सवलतीच्या दरात जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यास, तेथे कागद व्यापार संकूल उभारून अधिक चांगल्याप्रकारे व्यवसाय करता येईल, असेही शहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)