पुणे: थर्डआय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत साहिल क्षीरसागर (5-11) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पनवेल क्रिकेट स्पोर्टस संघाने फिनिक्स फ्लायर्स ब संघाचा 105 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पनवेल क्रिकेट स्पोर्टस संघाने 20 षटकात 8 बाद 170 धावा केल्या. यात मल्हार वंजारी 34, अभिषेक पाटील 33, शाहिद खान 39 यांनी संघाच्या डावाला आकार दिला. फिनिक्स फ्लायर्स ब संघाकडून आर्य केळकर (3-51), देव कदम (3-26) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
फिनिक्स फ्लायर्स ब संघाचा डाव 13.2 षटकात 65 धावांवर संपुष्टात आला. यात तन्मय कदम 32, प्रथमेश काळे 10 यांनी थोडा प्रतिकार केला. पनवेल क्रिकेट स्पोर्टसकडून साहिल क्षीरसागरने 11 धावांत 5 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी साहिल क्षीरसागर ठरला.
सविस्तर निकाल
साखळी फेरी – पनवेल क्रिकेट स्पोर्टस – 20 षटकात 8 बाद 170. (मल्हार वंजारी 34, अभिषेक पाटील 33, शाहिद खान 39, आर्य केळकर 3-51, देव कदम 3-26) वि.वि. फिनिक्स फ्लायर्स ब – 13.2 षटकात सर्वबाद 65. (तन्मय कदम 32), प्रथमेश काळे 10, साहिल क्षीरसागर 5-11, मल्हार वंजारी 2-4, चैतन्य भोईर 1-16, अक्षद रेडेकर 1-2); सामनावीर – साहिल क्षीरसागर.