डेहराडून – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला उत्तराखंडचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर म्हणून घोषित केले आहे. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विटवर ही घोषणा केली.
भारतीय क्रिकेट संघातील एक अव्वल खेळाडू, तरुणांचा आदर्श आणि उत्तराखंडचा पंत याला आमच्या सरकारने राज्याचा ब्रॅंड ऍम्बॅसीडर केले आहे. खेळाकडे वळण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य जपायला प्रवृत्त करण्यासाठी पंत राज्यातील तरुण पिढीला प्रवृत्त करेल, असेही ते म्हणाले.
पंत हा मुळचा उत्तराखंडचाच आहे. उत्तराखंड सरकारने ब्रॅंड ऍम्बॅसीडर घोषित केल्यानंतर पंतने मुख्यमंत्री धामी यांचे आभार मानले.
उत्तराखंडमध्ये खेळ आणि सार्वजनिक आरोग्याबाबत जागृती आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मी रुरकी सारख्या छोट्या शहरातून आलो. मला विश्वास आहे की येथील लोकांमध्ये देशासाठी अनेक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करण्याची क्षमता नक्कीच आहे, असे पंत म्हणाला.