पंकजा मुंडेंची पोस्ट 12 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण- विनोद तावडे

मुंबई: मुंडे-महाजन कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत, परंतु याचा अर्थ त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं नाही या बातम्या चुकीच्या आहेत. पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट ही 12 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण असल्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

पंकजा यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची पोस्ट पंकजा यांनी शेअर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. माजी बालकल्याण व ग्रामविकास मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उठत असून पंकजाताई या भाजपला सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत.” असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी या अफवांवर पडदा टाकला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×