Pankaja Munde – विद्यार्थ्यांच्या डोळ्यात असंख्य स्वप्ने आहेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्ट करा. सतत सकारात्मक राहा. आयुष्यात जय-पराजय होत असतात; पण आशा न सोडता लढत राहा, असा सल्ला पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.चऱ्होली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दहाव्या पदवी प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. कुलपती डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी को-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयानाचे भारतातील उच्चायुक्त धरमकुमार सीराज, भारत सरकारच्या इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ स्टडी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. निशिकांत ओझा, अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपच्या चेअरपर्सन पूजा पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, रजिस्ट्रार डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी विद्यापीठातर्फे क्रिकेटपटू रोहित शर्मा, मंत्री पंकजा मुंडे, उद्योजक व धोरणात्मक सल्लागार मनोज पोचट, गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष राशेश भन्साळी, सनातन धर्म फाउंडेशन सुदेश अग्रवाल, उज्जैन येथील गुरुजी प्रमोद शर्मा आदी सहा जणांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली.डॉ. राकेश कुमार जैन यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अभिनेत्री विद्या माळवदे यांनी केले. डॉक्टरेट मिळाल्याचा आनंद डॉक्टर किंवा लेखक व्हावे असे स्वप्न होते. पण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत व्हावे लागले. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केल्याबद्दल आनंद झाल्याचे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.