Pankaja Munde-Dhananjay Munde । राज्यात आज विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर भगवान गडावर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. त्यातच कृषिमंत्री धनंजय मुंडे हे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. मात्र या दसरा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचे फोटो नसल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
१२ वर्षानंतर भाऊ -बहीण दशहरा मेळाव्याला एकत्र Pankaja Munde-Dhananjay Munde ।
राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडावरील मेळाव्याकडे राज्यभराचे लक्ष वेधले जात होते. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू केला. यात पंकजा यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही बहिणी आणि राज्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थिती लावतात.
धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. मात्र, राज्यातील बदलत्या समिकरणात भाजपा आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेत सोबत आली आहे. लोकसभेसाठी निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे अनेक वर्षांनी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
फोटो कुठे असावे आणि नसावे हे फार महत्त्वाचे नाही Pankaja Munde-Dhananjay Munde ।
यानंतर आज सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे तब्बल 12 हजेरी लावणार आहेत. मात्र या दसरा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचे फोटो नसल्याने यबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्यासारखा भगवान बाबांचा एक भक्त. कुठला फोटो कुठे असावा यासाठी नाही तर बाबांची भक्ती आपण व्यक्त आणि करावी, त्यासाठी आपण तिथे जात आहे. फोटो कुठे असावे आणि नसावे हे फार महत्त्वाचे नाही, असे प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा
“भगवानबाबांना कोणाच्या राजकीय अस्तित्वाची गरज नाही”; महंत नामदेव शास्त्रींची महत्वाची प्रतिक्रिया