मुंबई – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन चरित्र उलगडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अॅण्ड पॅराडॉक्स या पुस्तकावर आधारित हा बायोपिक बनवला जाणार आहे. देशाचे माजी पंतप्रधान,भाजपचे नेते आणि एक देशभक्त असे अटलजींचेविविध पैलू या चित्रपटातून उलगडणार आहेत.
बॉलिवूडमधील कसलेला अभिनेता अशी ओळख असलेला पंकज त्रिपाठी यामध्ये अटलजींनी भूमिका साकारणार आहे. तर मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. रवीने आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए – अटल’ या कॅप्शनखाली शेअर केलेल्या पोस्टमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची जीवनकथा पडद्यावर मांडण्याचं भाग्य मला लाभलं असल्याचे रवी जाधव म्हणतो.
‘मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए – अटल’
It is an honour for me to bring to screen the story of a visionary, an exemplary leader and a humane politician, Shri Atal Bihari Vajpayee.#ATAL 📽️@TripathiiPankaj @vinodbhanu @thisissandeeps @directorsamkhan #KamleshBhanushali pic.twitter.com/znWYPg0djc— Ravi Jadhav (@meranamravi) November 18, 2022
यासोबतच रवी जाधवने पंकज त्रिपाठीसोबतचे काही फोटो देखील यावेळी शेअर आहेत. राजकीय नेत्यासोबतच अटलजी एक लेखक आणि कवी देखील होते त्यामुळे त्यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं पंकज तिवारी यावेळी म्हणाला. अटलजींसोबत त्यावेळी काम केलेल्या लाल कृष्ण अडवाणी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांच्या भूमिका कोण साकारणार याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.