#Panipat : ‘मन मै शिवा’ गाणं रिलीज

मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचे पोस्टर त्यांनी ट्विट करत आज प्रदर्शित केले. अपेक्षेप्रमाणे युध्दाचे आक्रमक प्रसंग, अ‌ॅक्शन यांचा संगम या पोस्टरमध्ये दिसून आले. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या पोस्टरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तर या चित्रपटातील गाण्यांना सुद्धा सोशल साईटवर तेवढीच दाद मिळत आहे.

दरम्यान, या चित्रपटातील गाण नुकतच प्रदर्शित झाले आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटातील ‘मर्द मराठा’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. तर  अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं ‘मन मै शिवा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


हर हर महादेव म्हणत अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री क्रिती सनॉन ‘मन मै शिवा’ गाण्यावर ठेका धरत आहेत. या गाण्यातून पुन्हा एकदा चित्रपटातील भव्यदिव्यता अधोरेखित होत आहे.


काही दिवसांपूर्वी, आशुतोष गोवारीकर यांनी पानीपत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. दरम्यान, मराठा साम्राज्याचा अस्त ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या प्रमुख मुख्य भूमिका आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.