धूमस्टाईल चोरांची शहरात दहशत; अडीच लाखांचे दागिने लांबविले

नगर – धूमस्टाईल मंगळसूत्र चोरांचा उच्छाद नगर व उपनगर सावेडीत गुरूवारपासून सुरू झाला आहे. या चोरांची एवढी दहशत पसरली आहे, की महिला घराबाहेर गळ्यात दागिने न घालता पडण्याचा निर्णय घेऊ लागल्या आहेत. शहरातील गजबजलेल्या गंजबाजार परिसरासह भुतकरवाडी व गुलमोहर रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरील चोरांनी लांबविले आहे. या तिन्ही घटनांमध्ये चोरांनी 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी देखील समांतर तपास सुरू केला आहे.

भुतकरवाडी परिसरात सकाळी पहिली घटना घडली. प्रमिला विजय गांधी (वय 58, रा. भुतकरवाडी) या चौकातून क्वालिटी कॉर्नर दुकानासमोरून जात असताना मोटरसायकलवरुन आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील गंठण लांबविले. यानंतर दुसरी घटना गंजबाजार परिसरात घडली. घरासमोर बसलेल्या महिलांना दरोडेखोर आले आहेत, सोने काढून ठेवा, असे सांगून चोरांनी त्यांच्या हातातून दोघा मोटरसायकलवरील चोरांनी 55 हजार रुपयांचे गंठण पळविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जयप्रकाश वाजिया यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. गुलमोहर रोडवरील मार्कंडेय सोसायटी परिसरात तिसरी घटना घडली. कुमोदिनी दुधाट या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. त्यामुळे मोटरसायकलवरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसका देवून ओढून नेले. या तिन्ही घटनांमुळे शहर आणि सावेडी उपनगरातील महिलांमध्ये मोटरसायकलीवरून येणाऱ्या चोरांची दहशत बसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)