दिल्लीमध्ये “पंगा’च्या शुटिंगला सुरुवात

कंगणा रणावतच्या “पंगा’च्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये नुकतेच या सिनेमाच्या शुटिंगचे पहिले शेड्युल पार पडले. कंगणाच्या बरोब्र तिच्या काही सहकलाकार मैत्रिणीही या शुटिंगमध्ये सहभागी झाल्या होत्या. गायक अभिनेता जस्सी गिलने सोशल मिडीयावरून याची माहिती दिली आहे. त्याने काही फोटोही शेअर केले आहेत. त्यात्‌ “पंगा’ची दिग्दर्शिका अश्‍विनी अय्यर आणि अन्य कलाकार मंडळी दिल्लीतील शुटिंग संपल्यानंतरचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. या फोटोखाली जस्सीने एका कॅप्शनमध्ये शुटिंगचे पुढचे शेड्युल कोलकाताला होणार असल्याचे म्हटले आहे.

या सिनेमाचे सगळे शुटिंग संपूर्ण देशभरात केले जाणार असल्याचेही जस्सीने सांगितले आहे. “पंगा’मध्ये नीना गुप्ता आणि पंकज त्रिपाठी हे लीड रोलमध्ये दिसणार आहेत. “पंगा’ हा मुलींच्या कबड्डी संघावर आधारीत सिनेमा आहे. या सिनेमासाठी कंगणाला काही महिन्यांपूर्वी कबड्डीचे प्राथमिक प्रशिक्षण घ्यायला लागले होते. “मणिकर्णिका’च्या यशानंतर खुशीत असलेल्या कंगणाला आता या नव्या सिनेमालाही तसेच चांगले यश मिळण्याची आशा वाटते आहे. आता ती कोणाकोणाशी “पंगा’ घेणार हे ही लवकरच समजेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.