पाकिस्तानाच्या मोर्चात झळकले मोदींसह जगातील प्रमुख नेत्यांचे फलक; स्वतंत्र ‘सिंधूदेशा’ची मागणी

सिंध : पाकिस्तानातील सिंध प्रांतात स्वतंत्र ‘सिंधू देशा’ची मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी रविवारी मोठी रॅली काढण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित जगभरातील प्रमुख नेत्यांचे पोस्टर झळकले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जगभरातील नेत्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

आधुनिक सिंधी राष्ट्रवादाचे संस्थापकांमधील एक जीएम सैयद यांची आज ११७वी जयंती आहे. यानिमित्त सान शहरात मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच जगभरातील नेत्याचे पोस्टर हातात घेऊन आंतरराष्ट्रीय समुदयाने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. यामध्ये नरेंद्र मोदी, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आणि अन्य नेत्यांचे पोस्टर होते.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत असून यासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे पाकिस्तानी सरकारच्या भीतीने लंडनसह इतर देशांमधून आपल्या मागण्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानी सरकारकडून दडपशाही केली जात असून अनेकदा येथील नागरिकांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. भारतानेही या दडपशाहीविरोधात संयुक्त राष्ट्रात आवाज उठवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.