पांड्या, ऋषभ पंत यांचा फलंदाजीचा सराव

भारत-इसेक्‍स तीन दिवसीय सराव सामना

चेम्सफोर्ड: हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी आणि ऋषभ पंतची फटकेबाजी यामुळे इसेक्‍सविरुद्ध तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या डावांत सर्वबाद 395 धावांची मजल मारली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आक्रमक प्रारंभ करणाऱ्या निक ब्राऊनला (11) पायचित करून उमेश यादवने ससेक्‍सला पहिला धक्‍का दिला. तसेच कर्णधार टॉम वेस्टलीच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 33 धावांची भर घालणाऱ्या वरुण चोप्राला (16) पायचित करून ईशांत शर्माने भारताला दुसरे यश मिळवून दिले. परंतु त्यानंतर मात्र कर्णधार टॉम वेस्टली आणि मायकेल कायली-पेपर यांची जोडी जमली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करीत ससेक्‍सचा डाव सावरला.

तत्पूर्वी पाच फलंदाजांनी अर्धशतके झळकावल्यामुळे भारतीय संघाने 3 बाद 44 अशा स्थितीतून 395 धावांची समाधानकारक मजल मारली होती. विराट कोहली आणि मुरली विजय, तसेच लोकेश राहुल व दिनेश कार्तिक यांच्या संघर्षपूर्ण भागीदाऱ्यांमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. इंग्लंडविरुद्ध आव्हानात्मक अशा कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला सरावासाठी मिळालेला हा एकमेव सामना आहे. परंतु हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर भारताच्या वरच्या फळीची दाणादाण उडाल्यामुळे मूळ समस्या कायम असल्याचेच दिसून आले.
त्याआधी ससेक्‍सच्या वेगवान गोलंदाजीसमोर शिखर धवन (0), चेतेश्‍वर पुजारा (1) आणि अजिंक्‍य रहाणे (17) हे भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. विराट कोहली (68) आणि मुरली विजय (53) यांनी चौथ्या गड्यासाठी 90 धावांची शानदार भागीदारी केली. तसेच दिनेश कार्तिक (82) आणि लोकेश राहुल (58) यांनी सहाव्या गड्यासाठी 114 धावांची बहुमोल भागीदारी करीत भारताच्या डावाला आकार दिला.

कालच्या 6 बाद 322 धावांवरून पुढे खेळताना दिनेश कार्तिक आज सकाळी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज पॉल वॉल्टरच्या गोलंदाजीवर डिक्‍सनने त्याचा झेल टिपला. कार्तिकने 95 चेंडूंत 14 चौकारांसह 82 धावांची खेळी केली. त्यानंतर ऍरॉन बीअर्डने करुण नायरचा केवळ 4 धावांवर त्रिफळा उडवीत भारताची 8 बाद 328 अशी अवस्था केली. परंतु दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या हार्दिक पांड्याने फटकेबाजी करताना अर्धशतकी खेळी केली.

रवींद्र जडेजाच्या साथीत 24 धावांची भर घालणाऱ्या पांड्याला पॉल वॉल्टरनेच बाद केले. पांड्याने 82 चेंडूंत 7 चौकारांसह 51 धावांची खेळी केली. मात्र अखेरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऋषभ पंतने जडेजाच्या साथीत 7.5 षटकांत 41 धावांची भर घालताना भारताला 395 धावांपर्यंत नेले. अखेर डिक्‍सनने जडेजाला (15) बाद करीत भारताचा डाव संपुषटात आणला.

ऋषभ पंतने केवळ 26 चेंडूंत 6 चौकारांसह 34 धावा फटकावून फलंदाजीचा सराव करून घेतला. ससेक्‍सकडून पॉल वॉल्टरने 113 धावांत 4 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. मॅट कोल्सने 31 धावांत 2 बळी घेतले. तर मॅथ्यू क्‍विन, ऍरॉन बीअर्ड, मॅट डिक्‍सन व ऍरॉन निज्जर यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक-
भारतीय संघ- पहिला डाव- 100.2 षटकांत सर्वबाद 395 (दिनेश कार्तिक 82, विराट कोहली 68, लोकेश राहुल 58, मुरली विजय 53, हार्दिक पांड्या 51, ऋषभ पंत नाबाद 34, पॉल वॉल्टर 113-4, मॅट कोल्स 31-2),
ससेक्‍स संघ- पहिला डाव- — षटकांत — बाद — (टॉम वेस्टली , मायकेल कायली-पेपर, )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)