माऊलींच्या समाधीवर आळंदीत पांडुरंग अवतरले

आळंदी -येथे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय्य तृतीयानिमित्त संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान असलेले श्री क्षेत्र पंढरपूर येथील भगवंत पांडुरंगाचा चंदन रुपी उटी अवतार साकारण्यात आला आहे. 

यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी आणि स्वकाम सेवा मंडळ यांच्या वतीने पांडुरंगाचा चंदन रुपी उटी अवतार साकारण्यात आला.

याप्रसंगी मंदीरात आकर्षक मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली होती.
ही उटी अभिजीत दहीफले, पुजारी सौरभ चौधरी, मोरेश्‍वर जोशी आणि योगेश चौधरी यांनी साकारली.

यावेळी संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक डॉ. सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर, आशा तापकीर, मनसुख लोढा, सुभाष बोराटे, धनाजी तापकीर, ज्ञानेश्‍वर वहीले,

बाळासाहेब गांधीले, संभाजी चौधरी, संभाजी फुगे, संदीप पोटावडे, संतोष आरूडे, सत्यवान बर्गे आणि स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक व सेवकवर्ग उपस्थित होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.