पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! – संभाजीराजे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मराठा समाजाला महाराष्ट्रात देण्यात आलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार दिला आहे. या निर्णयावर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाला विठ्ठल पावला अशी प्रतिक्रीया देत आम्ही खूश असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांनी ट्विटरवरुन सरकारी वकिलांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे की,’पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात स्थगिती नाही. सरकारी वकिलांच अभिनंदन!’  असे ट्विट त्यांनी केले आहे.’ तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठा समाजाला राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या आरक्षणाला वैध ठरवले होते. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. मात्र यावेळी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आपण मराठा आरक्षणाच्या निर्णययावर स्थगिती आणणारी याचिका जरी फेटाळली असली तरी मराठा समाजाला महाराष्ट्रात देण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास तयार असल्याचे म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.