प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं आज वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले आहे. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. त्यांनी बॉलिवूडमधील काही गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले होते. अभिनेत्री माधुरी दिक्षीत व अभिनेत्री दिपीका पादुकोण यांना बॉलिवुडमधील गाण्यासाठी बिरजू महाराज यांनी प्रशिक्षण दिले होते.
मोहे रंग दो लाल
रणवीर व दीपिकाचा बहुचर्चीत चित्रपट बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दीपिका पादुकोणवर चित्रीत झालेले मोहे रंग दो लाल या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन पंडित बिरजू महाराज यांनी केले होते. या गाण्यातील दीपिकाच्या क्लासिकल डान्सनं अनेकांची मनं जिंकली होती. या गाण्याला आता सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
काहे छेड मोहे
अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री माधुऱी दिक्षीत व अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचा देवदास हा चित्रपट आला या चित्रपटातील गाण्यांनी चाहत्यांना भूरळ घातली आहे. यामध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी माधुरी दिक्षीतच्या काहे छेड मोहे या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन बिरजू महाराज यांनी केले आहे.
उन्नई कनाडू नान
अभिनेता कमल हसनच्या विश्वरुपम या चित्रपटातील उन्नई कोडू नान या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन पंडित बिरजू माहाराज यांनी केले आहे. या गाण्यात अभिनेता कमल हसनला कथ्थक करताना पाहून अनेक जण थक्क झाले होते. हा चित्रपटात कमल हसनच्या कथ्थकचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले होते.
जगावे सारी रैना
डेढ इश्किया या चित्रपटातील जगावे सारी रैना या गाण्याचे देखील नृत्य दिग्दर्शन पंडित बिरजू माहाराज यांनी केले आहे. या गाण्यामधील माधुरीच्या एक्सप्रेशन्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
अशा या अनोख्या ताऱ्याने आज जगाचा निरोप घेतला आहे. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.