पंढरपुर: इलेक्शन ड्युटीला जाणे शिक्षकाला बेतले जीवावर; कुटुंबातील चौघांचाही कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर : पंढरपूरमध्ये नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीमुळे अनेकांना यामुळे प्राण गमवावा लागला कारण इथे वाढलेला कोरोना. दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेत आपले कर्तव्य बजावत होते त्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. एवढेच नाही तर त्यांच्या संसर्गाने इतरांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत. सांगोला तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. इथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद माने यांच्यावर सुरुवातीला सांगोला इथे उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई इथे हलवले. मात्र तिथे उपचार सुरु असताना प्रमोद माने यांचे निधन झाले.

यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुलाने कोरोनावर मात केली. परंतु या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे नियमितपणे सुरु होते. परिणामी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे. तर गेल्या 20 दिवसांत 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.