Pandharpur Elections Results 2021: पंढरपुरात भाजपच्या समाधान आवताडे यांनी मारली बाजी

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस पोस्टल मतांनी सुरवात झाली आहे. यानंतर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीस सुरवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणीस सुरवात झाली आहे. मतमोजणी पूर्ण होण्यास सायंकाळी साडेसात ते आठ वाजतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होती मात्र आता बाजी पलटताना दिसत असून भाजपने आघाडी घेतली आहे.

पंढरपुरात नवव्या फेरीअखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांची आघाडी तुटली आहे. कारण आता भाजपचे समाधान आवताडे 2 हजार 357 मतांनी बाजी मारली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,पंढरपूर पोटनिवडणुकीच्या सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादीने आघाडी कायम ठेवली होती. सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांनी 194 मतांची आघाडी घेतली होती.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपने आघाडी घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या फेरीत राष्ट्रवादीने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरी अखेर भगीरथ भालके यांनी 650 मतांची आघाडी घेतली होती, तर चौथ्या फेरी अखेर 638 मतांची भालके यांची आघाडी घेतली होती, पाचव्या फेरीअखेर त्यांनी 658 मतांची आघाडी घेतली आहे, तर आता सहाव्या फेरीअखेर 194 मतांची आघाडी घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.