सोलापूर : राज्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघाचा आकार आणि एकूण मतदारांची संख्या पाहाता दुपारपर्यंत पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळत आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांना पंधराव्या फेरीअखेर ३ हजार ८०० मतांची आघाडी मिळालीय
मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली.
दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत.