बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक

गुजरवाडीतील बैलगाडा शर्यत प्रकरणी 12 अटक ; दोघे फरार

पुणे – बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालय व राज्य सरकारने बंदी घातलेली असतानाही गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला होता. यातील 12 जणांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बैलगाडा शर्यतीसाठी राज्यात प्रसिध्द असणाऱ्या पंढरीनाथ फडकेंचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे जिल्हयात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही शनिवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार संतोष अशोक ननवरो(रा.कोंढवा), राहुल चौधरी, बाळासाहेब खोपडे, तात्या मांगडे, योगेश बाळासाहेब रेणूसे(29,रा.वेल्हा), मयुर दिलीप शेवाळे, पंढरीनाथ फडके, वामन विनायक फडके(65), हरिचंद्र भागा(58), पदमाकर रामदास फडके (28) , ऋषीकेश सुर्यकांत, संकेश शशिकांत चोरगे(21), यश राजू श्रिंगारे . संतोष शिवराम कुडले अशी आरोपींची नावे आहेत.

ऊच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकार यांनी बैलांची शर्यत आयोजीत करणेवर बंदी आदेश केला असताना देखील यातील आरोपींनी आदेशाचा भंग करुन गैर कायदयाचा जमाव जमवला होता. तसेच बेकायदेशीरपणे बैलांची शर्यत आयोजीत करुन बैलांना गाडयांना जोडुन त्यांना निर्दयतेपणे मारहान करुन, त्यांच्या शेपटया पिरगाळुन त्यांना जबरदस्तीने आरडा ओरडा करत पळवुन निर्दयतेने वागवुन दिली.

शर्यतीचे आयोजक व सहभागी होणारे इतर इतरांना बैलांची शर्यत करणे बेकायदेशीर असले बाबत समजावत असताना त्यांनी पोलीस हवालसदार चिप्पा यांच्यासोबत वाद-विवादकरुन धक्का बुक्की केली. फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा करुन शर्यतीमधील एक बैल व एकछकडा असे पळवून लावले.

कोरोना या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होवु नये यासाठी जिल्हाअधिकारी व महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील अटींचे पालन न करता सदर आदेशाचा भंग केला म्हणुन गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.