पंचनाम्याचे काम पूर्णत्वाकडे

अहवाल हाती येण्यास दोन ते तीन दिवस लागणार

गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बाधीत क्षेत्राचे पंचनामे सुरू असल्याने रब्बी हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या तरीही ज्या भागात जमिनीत ओल भरपूर आहे तेथे गव्हाचे क्षेत्र वाढू शकते तर ज्या ठिकाणीहरभऱ्यास पोषक वातावरण आहे तेथे हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

नगर – जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांपैकी 1557 गावातील 5लाख 68 हजार 678 शेतकऱ्यांच्या 421384 .4 लाख हेक्‍टर जमिनीचे पंचनामे दि.11 रोजी पूर्ण झाली असून उर्वरित पंचनामे करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखीन दोन ते तीन दिवस लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांपैकी नगर तालुक्‍यातील 89 गावात 21034 शेतकऱ्यांच्या 18116 ,पाथर्डी तालुक्‍यातील 137 गावातील 76,344 शेतकऱ्यांच्या आतापर्यंत 59392 हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर पारनेर तालुक्‍यातील 106 गावांमधून40 हजार 224 शेतकऱ्यांच्या 22 हजार 216हेक्‍टर जमिनीचे पंचनामे झाले होते. कर्जत तालुक्‍यातील118 गावांमधून30749 शेतकऱ्यांच्या 28548.43 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे करण्यात आले आहेत,श्रीगोंदा तालुक्‍यातील 115 गावातील 45506 शेतकऱ्यांचे 31648.96 हेक्‍ट्रर जमिनीचे पंचनामे करण्यात आले आहेत जामखेड मध्ये 72 गावातून 9169 शेतकऱ्यांच्या 4561 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे केले आहेत.

श्रीरामपूर तालुक्‍यातील 56 गावातून 30 हजार 749 शेतकऱ्यांच्या 28548.43 एवढ्या क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. तर नेवासे तालुक्‍यातून 127 गावातील 56135 शेतकऱ्यांच्या 45222.87 हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत शेवगाव तालुक्‍यातील 113 गावांच्या 46523 शेतकऱ्यांच्या चाळीस हजार 404हेक्‍टर जमीनीचे पंचनामे करण्यात आले आहेत,राहुरीतील 96 गावातील 40,825 शेतकऱ्यांच्या 29429.26हेकटर जमीनीचे पंचनामे केले आहेत.

संगमनेर येथीेल 172 गावातील49716शेतकऱ्यांच्या31939.82 हेकटर तर अकोले येथील191 गावातील 59055 शेतकऱ्यांच्या 28389 हेक्‍टर जमीनीचे पंचनामे केले आहेत तर कोपरगावातील 79 गावातील 41445 शेतकऱ्यांच्या 34275 हेक्‍टर जमीनीचे पंचनामे केले आहेत तर राहाता येथील 61 गावातील 17921शेतकऱ्याच्या ं22131 हेक्‍टर जमीनीचे पंचनामे झाले आहेत अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.अशी एकुण शेतकर्यांची आकडेवारी 148 टक्केवारी असून जमीनीची आकडेवारी 143.42 टक्के एव्हढी आहे.

जिल्ह्यात खरीपाचे जिरायती,बागायती आणि फळबागांचे पंचनामे यात करण्यात आले जिरायती जमीनीसाठी 6800 बागायती जमीनीसाठी 13,500 तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
आतापर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असूनत्याच्या आकडेवारीच्या संकलनासाठी दोन दिवस लागणार असल्याची माहिरी कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)