पॅन कार्ड -आधार कार्ड ‘या’ तारखेपर्यंत लिंक करता येणार

मुंबई : सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.

लोकांच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी सरकारने आधार आणि पॅन कार्ड (PAN) जोडणे बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची तारीख सातत्याने वाढवण्यात आली होती. त्यानुसार येत्या 30 जूनपर्यंत आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड बंद होईल. मात्र अनेकदा आपले आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही, याची आपल्याला माहिती नसते. जर तुम्हालाही तुमचे आधार कार्ड -पॅन कार्ड लिंक असल्याची माहिती नसेल तर तुम्ही खालील पर्यायाद्वारे ते जाणून घेऊ शकता.

जर तुम्ही आधारकार्ड पॅनशी जोडलं नसेल तर त्याला 1000 रुपये दंड होऊ शकतो. यासह पॅनकार्ड बंद होऊ शकते. नवीन मार्गदर्शक तत्त्वे आयकर कायदा 1961 च्या नवीन कलम (कलम 234 एच) अंतर्गत येतात. जे वित्त विधेयक 2021 मंजूर झाल्यावर अलीकडेच जोडले गेले होते.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?
आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा. इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा. यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा. सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

पॅनशी आधार जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता. यासाठी आपल्याला UIDPAN 12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा.

पॅनकार्डसह आधार लिंक करण्यासाठी अधिकृत आयकर वेबसाईट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा. ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. हे केल्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यात पॅन, आधार क्रमांक आणि आपले नाव भरा. जर आपल्या आधारवर फक्त जन्माचे वर्ष लिहिले गेले असेल तर आपणास हा पर्याय निवडावा लागेल – ‘आधार कार्डमध्ये माझ्याकडे फक्त जन्माचे वर्ष आहे’. आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लिंक आधारावर क्लिक करा. हे केल्यावर प्रक्रिया पूर्ण झालेलं पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये पॅनशी संबंधित माहिती दिसेल.

ऑफलाईन लिंकसाठी आपल्याला PAN सेवा प्रदाता, NSDL किंवा UTIITSL च्या सेवा केंद्रास भेट द्यावी लागेल. येथे ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत सोबत अन्य काही कागदपत्रेही कॉपी करावी लागतील. या वेळी आपल्याला निश्चित फी देखील द्यावी लागेल. या प्रक्रियेद्वारे आपण पॅनला आपल्या आधारशी लिंक करू शकता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.