नवी दिल्ली: पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास अर्थमंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. याआधी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. याबाबत शनिवारी सीबीडीटीने एक परिपत्रक काढले आहे.
आधारसोबत पॅन कार्ड क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. अन्यथा पॅन कार्ड निष्क्रीय होणार असल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटवरून आधार-पॅन लिंक करता येईल. त्याशिवाय आधारसोबत लिंक करताना पॅन कार्ड आणि आधारमधील माहितीत कोणत्याही प्रकारची विसंगती नाही हे ही काळजीपूर्वक पाहावे लागणार आहे. दोन्ही कार्डमधील माहितीत तफावत असल्यास दुरूस्ती करता येणार आहे. आधारसोबत पॅन कार्ड लिंक न केल्यास आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड वापरता येणार नाही.