Accident News : पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Accident News) मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील धानीवरी परिसरात हा भीषण अपघात झाला. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये 100 हून अधिक लोक प्रवास करत असल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. (Accident News) घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. (Accident News) या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एकाच वेळी इतक्या जणांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. (Accident News) हेही वाचा Pune Accident: शिवसेना ठाकरे गटातील नेत्याचा भीषण अपघात, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू