पळसदेवमध्ये वारकऱ्यांना ‘प्रभात’ अंकाचे वाटप

पळसदेव – पळसदेव येथे श्री पळसनाथ मंदिरात विसाव्यासाठी असलेल्या रेडेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळ्यात दैनिक प्रभातच्या अंकाचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व प्रभातचे वाचक मिलिंद फासे यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत अंकाचे वाटप करण्यात आले.

पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांना वारीच्या इतर घडामोडी, ज्ञानोबा व तुकोबांच्या पालखीची माहिती, सामाजिक व राजकीय घडामोडीची माहिती मिळण्यास मदत झाली. यावेळी म्हंतुशेठ सहाणे, अध्यक्ष पाई वारी,बाळासाहेब शेळके, बबन गुंजाळ, नागेश कुराडे, सखाराम कुराडे, पांडुरंग गाडवे यांसह इतर वारकऱ्यांना “प्रभात’चे अंक देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे, मिलिंद फासे, लक्ष्मण शिंदे, शिवाजी बनसुडे, औदुंबर मरळे, कालिदास चव्हाण, देवीदास शेलार, सुरेश माने, पुरुषोत्तम चव्हाण, ऋषिकेश पवार, आतिष क्षत्रिय, नागरिक व वारकरी उपस्थित होते. यावेळी वारकऱ्यांनी ‘प्रभात’चे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.