पळसदेव -हनुमान जयंतीच्या निमित्ताने शनिवारी (दि. 16) भव्य कुस्तीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार केसरी पिंटू काळे यांनी दिली. सध्या आखाड्यात जंगी तयारी सुरु आहे. लाईट लावणे, स्टेज उभारणे, परिसरात साफ सफाईची कामे जोरात सुरु आहेत.
या वेळी या ठिकाणी नेत्रदिपक लढती पाहावयास मिळणार आहेत. या वेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी व उपविभागीय अधिकारी विजय चौधरी, अर्जुन पुरस्कार विजेते राहुल आवारे उपस्तित राहणार आहेत.
राष्ट्रीय पातळीवर मैदान गाजवलेले पैलवान आखाड्यात उतरणार असल्याने कुस्ती शौकिनांना एक पर्वणी ठरणार आहे. यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 15) पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून शनिवारी कुस्ती आखाडा व सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन देखील करण्यात आले आहे.