कराची : शाहीन अफरीदी आणि मोहम्मद अब्बास यांच्या अचूक मा-याच्या जोरावर पाकने दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला पहिल्या डावात २७१ धावांत रोखले. श्रीलंकेने पहिल्या डावात पाकवर ८० धावांची आघाडी घेतली आहे.
Innings break | Sri Lanka 271-all out (85.5 ov) lead Paksitan 1st Innings by 80 runs.
Dinesh Chandimal 74, Dilruwan Perera 48, Dhananjaya de Silva 32 | Shaheen Afridi 5/77, Mohammad Abbas 4/55 #PAKvSL pic.twitter.com/vlNwMbbKEA— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 20, 2019
श्रीलंकेकडून पहिल्या डावात दिनेश चंडीमलने ७४, दिलरूवान परेराने ४८, धनंजया डि सिल्वाने ३२, दिमुथ करूणारत्नेने २५ आणि निराशेन डिकवेला याने २१ धावा केल्या. पाककडून पहिल्या डावात गोलंदाजीत शाहीन अफरीदीने लंकेचा निम्मा संघ गारद केला तर मोहम्मद अब्बासने ४ आणि हारिस सोहैलने १ गडी बाद केला.
A first five-wicket haul in Test cricket for Shaheen Afridi. The first of many. #PAKvSL pic.twitter.com/XGH1KEXWpQ
— ICC (@ICC) December 20, 2019
यानंतर दुस-या दिवसअखेर पाकिस्ताने दुस-या डावात चांगली सुरूवात केली असून १४ षटकांत बिनबाद ५७ धावा केल्या होत्या. पाक अजूनही २३ धावांनी पिछाडीवर आहे. खेळ थांबला, तेव्हा शान मसूद २१ आणि आबिद अली ३२ धावांवर खेळत होता.
Day 2 Stumps, Pakistan 57/0 trail by 23 runs. #PAKvSL pic.twitter.com/Vq3GWqevJO
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 20, 2019
दरम्यान, श्रीलंकेने लाहिरू कुमारा आणि लसिथ एम्बुलदेनियाच्या प्रत्येकी ४ बळींच्या जोरावर पाकिस्तानला पहिल्या डावात १९१ धावांत रोखले. पाककडून पहिल्या डावात असद शफिकने ६३, बाबर आझमने ६० आणि अबिद अलीने ३८ धावा केल्या.