#PAKvSL 2nd Test : पहिल्या दिवसअखेर श्रीलंका ३ बाद ६४

पाकिस्तानच्या पहिल्या डावात सर्वबाद १९१ धावा

कराची : पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यास आजपासून सुरूवात झाली आहे. दुस-या कसोटीत पाकचा पहिला डाव १९१ वर आटोपला असून त्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ३ बाद ६४ अशी मजल मारली असून अजूनही ते १२७ धावांनी पिछाडीवर आहेत.

तत्पूर्वी पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. पाकने असद शफीफच्या ६३, बाबर आझमच्या ६० आणि आबिद अलीच्या ३८ धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद १९१ धावा केल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीत पहिल्या डावात लसित एम्बुलडेनिया आणि लहिरू कुमारा याने प्रत्येकी ४ गडी बाद केले तर विश्वा फर्नान्डोने २ गडी बाद केले.

त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात श्रीलंकेने ओशदा फर्नांडो ४, दिमुथ करूणारत्ने २५ आणि कुसल मेंडिस १३ धावांवर गमावत पहिल्या दिवसअखेर १९ षटकात ३ बाद ६४ अशी मजल मारली आहे. पाककडून गोलंदाजीत मोहम्मद अब्बासने २ तर शाहीन अफरीदीने १ गडी बाद केला. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा एंजेलो मैथ्यूज ८ आणि लसित एम्बुलडेनिया ३ धावावर खेळत होते.

दरम्यान, २००९ नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी सामने होत आहेत. या मालिकेतील पहिली लढत पावसामुळे अनिर्णित राहिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.