रावळपिंडी : मूसळधार पाऊस आणि खराब सूर्य प्रकाशामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी केवळ १८ षटकांचा खेळ होऊ शकला. श्रीलंका संघ २००९ दहशतवादी हल्लयानंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळत असल्यानं हा सामना ऐतिहासिक आहे, पण या सामन्याच्या दुस-या दिवसाच्या खेळावर पावसानेच वर्चस्व गाजवले.
श्रीलंकेने कालच्या ५ बाद २०२ धावसंख्येवरून सकाळी पुढे खेळायला सुरूवात केली तेव्हा ७.५ षटकांचा खेळ झाल्यानंतर जेव्हा त्यांची धावसंख्या ५ बाद २२५ वर पोहचली, त्यावेळेस पावसास सुरूवात झाली आणि दोन्हीही संघाना लवकर उपहार(लंच) करावा लागला.
Rain has stopped play in Rawalpindi 🌧️
Sri Lanka are 222/5 after 76 overs, with Dhananjaya de Silva (54*) and Niroshan Dickwella (15*) at the crease.#PAKvSL SCORECARD ▶️ https://t.co/CKfg2Y3ATf pic.twitter.com/alUZaIyWMp
— ICC (@ICC) December 12, 2019
पावसामुळं खेळ २ तास ४३ मिनिटापर्यत थांबला आणि जेव्हा परत सुरू झाला तेव्हा फक्त १० षटकांचा खेळ शक्य झाला या दरम्यान श्रीलंकेने निरोशन डिकवेलाच्या रूपात विकेट गमावली, त्याने ३३ धावा केल्या.
Stumps in Rawalpindi.
There's been little action today due to the weather – Sri Lanka lost one wicket and will begin day three on 263/6. #PAKvSL SCORECARD 👉 https://t.co/CKfg2Y3ATf pic.twitter.com/w1wzkkBX5U
— ICC (@ICC) December 12, 2019
खराब सूर्य प्रकाशामुळे दुस-या दिवसाचा खेळ नियोजित वेळेपेक्षा लवकर (स्थानिक वेळेनुसार ३ वाजून ३० मिनिटांनी) संपविण्याचा निर्णय पंचानी घेतला. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या संघाने ६ बाद २६३ धावा केल्या होत्या आणि खेळपट्टीवर धनंजय डिसिल्वा ७२ आणि दिलरूवान परेरा २ धावांवर खेळत होता.