वॉशिंग्टन – पत्रकार डॅनिअल पर्लच्या मारेकऱ्यांना निर्दोष सोडण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. त्याच्यावर पाकिस्तानचे विदेश मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादाला बळी पडलेल्यांसाठी हा निकाल निराशाजनक आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पर्ल यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन होईल यासाठी पाकिस्तान सरकारने सर्व कायदेशीर पर्यायांचा मार्ग अनुसरावा, अशी मागणीही अमेरिकेने केली आहे. सन 2002 साली डॅनिअल पर्ल यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पर्ल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार होते. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर यंत्रणा आणि अल-कायदा यांनी संघटितपणे त्यांच्या हस्तकांकरवी हे कृत्य केले, असा आरोप केला जात होता. या प्रकरणी अल-कायदाचा दहशतवादी अहमद कमर आणि सईद शेख यांच्यावर पर्लचे अपहरण व हत्या प्रकरणात आरोप दाखल करण्यात आला होता. तथापि गुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले आहे.